गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड, 08 डिसेंबर : पिंपरी चिंचवडमधून अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली आहे. पिंपरीमधील वाकड भागात एका मोकळ्या जागेत चिमुकल्याचा मृदतेह जळालेल्या अवस्थेत सापडला आहे. मुलाची ओळख अजून पटलेली नाही. भटक्या कुत्र्यांनी मुलाचा मृतदेह जमीन उकरून बाहेर काढला. तेव्हा स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीनं पोलिसांना बोलावलं. कुणीतरी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्यानं पोलिसांनी प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत. तर या सगळ्यामुळे संपूर्ण पिंपरी हादरून गेली आहे.