#court

Showing of 79 - 92 from 867 results
नगर- नाशिकच्या नेत्यांना धक्का, आता मराठवाड्याला मिळणार हक्काचं पाणी

महाराष्ट्रOct 31, 2018

नगर- नाशिकच्या नेत्यांना धक्का, आता मराठवाड्याला मिळणार हक्काचं पाणी

नगर आणि नाशिकचं पाणी मराठवाड्याला मिळणार का यावरून सध्या महाराष्ट्राचं राजकारण पेटलंय. पाणीप्रश्न आंतरराष्ट्रीय राजकारणसुद्धा पेटवू शकतो. सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या पाणी वाटपावरून आपल्याला हा अनुभव आहेच. मात्र यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती ओढवल्यानंतर आता जिल्ह्या- जिल्ह्यातलं पाणी पेटायला सुरुवात झाली आहे. असं असताना मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडीत पाणी सोडण्याचा आदेश दिला आहे. जायकवाडीत पाणी सोडू नये यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे पाणी सोडू नये यासाठी आंदोलन करणाऱ्या नगर आणि नाशिकमधल्या नेत्यांना धक्का बसला आहे.

Live TV

News18 Lokmat
close