#corporation

Showing of 66 - 79 from 397 results
VIDEO : अन् सभागृहात कोसळला लाकडी ठोकळा; विरोधी पक्षनेते बसले हेल्मेट घालून!

व्हिडिओSep 18, 2018

VIDEO : अन् सभागृहात कोसळला लाकडी ठोकळा; विरोधी पक्षनेते बसले हेल्मेट घालून!

पुणे, 18 सप्टेंबर : पुणे महानगरपालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीमध्ये आज सर्वसाधारण सभा पार पडली. सभा सुरू असतानाच छोटा लाकडी ठोकळा छतावरून खाली कोसळला. त्यामुळं सत्ताधारी बुचकळ्यात पडले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे हेल्मेट घालून सभेला बसले. याच इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळेस छत गळल्यानं मोठी चर्चा झाली होती. पुणे महानगरपालिकेच्या नव्या विस्तारीत इमारतीसाठी खर्च करण्यात आलेले 50 कोटी पाण्यात गेले असंच म्हणावं लागेल. कारण पावसाळ्यात इमारतीचं छत गळलं तर आज लाडकी ठोकळा छतावरून खाली कोसळला. ऐन सभा सुरू असताना ठोकळा कोसळल्यानं सत्ताधाऱ्यांची चांगलीच नाचक्की झालीय. सत्ताधाऱ्यांवर संधान साधण्याची ही संधी विरोधकांनी सोडली असती तरच नवल. लागलीच काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी हेल्मेट घालून सभेला हजेरी लावली. दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या याच इमारतीच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांसमोर इमारतीचं छत गळलं होतं. त्यावेळीही इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची जोरदार चर्चा झाली होती.

Live TV

News18 Lokmat
close