Congress Rally

Congress Rally - All Results

VIDEO : जगाच्या नकाशावर पाकिस्तानची खूणसुद्धा राहता कामा नये - भिडे गुरूजी

व्हिडीओFeb 15, 2019

VIDEO : जगाच्या नकाशावर पाकिस्तानची खूणसुद्धा राहता कामा नये - भिडे गुरूजी

सांगली, 15 फेब्रुवारी : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीनं रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेदेखील सहभागी झाले होते. यावेळी न्युज18 लोकमतशी बोलताना त्यांनी अत्यंत तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध केला. ''हा हल्ला केवळ जवानांवरच झाला नसून, संपूर्ण देशावर झाला आहे. कोणी विट मारली तर दगडानं त्याला उत्तर द्यावं, दगड कोणी मारला तर तडक गोळीनं उत्तर द्यावं आणि कुणी आग होऊन आलं तर वणवा होऊन त्याला गिळंकृत करायला हवं, ही शिवछत्रपतींची निती होती. त्यामुळे आता ताबडतोब कृती व्हायला हवी. जगाच्या नकाशावर पाकिस्तान हा देश होता याची खूणसुद्धा राहता कामा नये,'' अशा तीव्र शब्दात त्यांनी आपला रोष व्यक्त केला. पाहूया आणखी काय म्हणाले भिडे गुरुजी...

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading