Company Videos in Marathi

VIDEO : राहुल गांधींनी 'त्या' कंपनीसाठी दिला बिग बींच्या भावाचा पत्ता, जेटलींचा आरोप

व्हिडीओMay 4, 2019

VIDEO : राहुल गांधींनी 'त्या' कंपनीसाठी दिला बिग बींच्या भावाचा पत्ता, जेटलींचा आरोप

नवी दिल्ली, 04 मे : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींवर गंभीर आरोप केला आहे. यूपीएच्या काळात स्कॉर्पीन पाणबुडीचं कंत्राट ज्या डीसीएनएस कंपनीला मिळालं, त्या कंपनीनं एका छोट्या कंपनीला ऑफसेट कंत्राट दिलं, त्या छोट्या कंपनीत राहुल गांधी आधी भागीदार होते, असा दावा जेटलींनी केला आहे. राहुल गांधींनी संरक्षण करारांमध्ये मध्यस्थी करण्यासाठीच बॅक-ऑप्स नावाची कंपनी जन्माला घातली, असा आरोपही जेटलींनी केला. दरम्यान, ब्रिटनमधील बॅक-ऑप्स कंपनीचा पत्ता म्हणून अमिताभ बच्चन यांचे बंधू अजिताभ बच्चन यांच्या घराचा पत्ता देण्यात आला, असा आरोपही जेटलींनी केला.

ताज्या बातम्या