#cm

Showing of 1 - 14 from 2028 results
2 तासांपासून प्रफुल पटेल यांची चौकशी, पाहा ईडी कार्यालयातून GROUND REPORT

महाराष्ट्रOct 18, 2019

2 तासांपासून प्रफुल पटेल यांची चौकशी, पाहा ईडी कार्यालयातून GROUND REPORT

मुंबई, 18 ऑक्टोबर: राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेलांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीजे हाऊस प्रकरणात ईडीकडून प्रफुल्ल पटेलांनी नोटीस बजावण्यात आली आहे. आज ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. 2 तासांहून अधिक काळ प्रफुल्ल पटेलांची मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे. छगन भुजबळ, शरद पवार ज्यावेळेस ईडीसमोर हजर झाले होते त्यावेळेस ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कार्यालयाबाहेर जमावबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आज प्रफुल्ल पटेल ईडीसमोर हजार झाल्यावर ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता हजर नव्हता. त्यामुळे प्रफुल्ल पटेल एकाकी पडल्याचं चित्र आहे.