Chemical Company

Chemical Company - All Results

VIDEO : भगाराच्या गोदामाला भीषण आग; इतर गोदामेही पडली आगीच्या भक्ष्स्थानी

व्हिडीओDec 31, 2018

VIDEO : भगाराच्या गोदामाला भीषण आग; इतर गोदामेही पडली आगीच्या भक्ष्स्थानी

पिंपरी-चिंचवड, 30 डिसेंबर : एका केमिकल कंपनीतील भंगार ठेवलेल्या गोदामाला भिषण आग लागली आहे. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या तब्बल 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. लाकडी सामान ठेवण्यासाठी या गोदामाचा उपयोग केला जात होता. त्यामुळेच ही आग जास्त भडकली असून त्यात आत्तापर्यंत 6 मोठी गोदामे जळून खाक झाली असल्याची माहिती आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, ही आग पसरत चालल्याने या परिसरातील इतर गोदामेही आगीच्या भक्ष्स्थानी पडली आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून या परिसरातील नागरिकांना घटनास्थळा पासून दूर ठेवण्यात आलं आहे. रविवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास लागलेली ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. लवकरच आगीवर नियंत्रण मिळवता येईल, अशी शक्यता पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन विभागाचे प्रमुख किरण गावडे यांनी व्याक्त केली.

ताज्या बातम्या