सोनिया राणा, प्रतिनिधी भोपाळ, 24 डिसेंबर : दारू स्वस्त व्हावी यासाठी सध्या लोक काय करतील याचा नेम नाही. दारू स्वस्त करा या मागणीसाठी हा युवक चक्क मोबाईलच्या टॉवरवर चढला आहे. भोपाळच्या भारत टॉकिजजवळील हा व्हिडिओ आहे. दारू स्वस्त करा नाहीतर आत्महत्या करेन असं या युवकाचं म्हणणं होतं. पोलिसांनी खूप वेळ समजवल्यानंतर अखेर त्याला खाली उतरवण्यात आलं.