#chandrashekhar rao

VIDEO VIRAL : तेलंगणात मतदारांना रांगेत बसवून वाटले पैसे

व्हिडिओNov 30, 2018

VIDEO VIRAL : तेलंगणात मतदारांना रांगेत बसवून वाटले पैसे

अदिलाबाद, 30 नोव्हेंबर : तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत लोकांना पैसे वाटप करणाऱ्या तेलंगणा राष्ट्र समितीच्या एका नेत्याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पैसे वाटप करणाऱ्या त्या नेत्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची गुरुवारी अदिलाबादमधील एका गावात जाहीर सभा पार पडली. सभेदरम्यान, लोकांना प्रत्येकी 300 रुपये वाटले जात असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली. त्यांनी तात्काळ धाव घेतली आणि लोकांना पैसे वाटप करणाऱ्या TRS च्या नेत्याला रंगेहात पकडलं.