संजय तिवारी, हैदराबाद, 8 फेब्रुवारी : हैदराबादमध्ये मेट्रो स्टेशनवर दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी लावलेली लिफ्ट अश्लील चाळे करणाऱ्यांसाठी अड्डा बनली आहे. स्टेशनवर सीसीटीव्ही लावलेले असतानाही असे चाळे करणाऱ्यांनी लिफ्टचा आधार घेतला आहे. तरुणांना लिफ्टमध्ये कॅमेरे नसावेत असं वाटतं. आता असाच एका प्रेमी युगुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यानंतर रेल्वेच्या एमडींनी याची चौकशी करुन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. यात फक्त तरुणांचा शोध घेणं एवढाच हेतू नसून हे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल कसे झाले हे माहिती होणं महत्त्वाचं आहे. सीसीटीव्ही ऑपरेट करणाऱ्या कोणी हे केले असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यानंतर रेल्वे प्रशासन स्टेशनवर सुचना फलक वाढवण्याचा विचार करत आहे.