Car Videos in Marathi

Showing of 66 - 79 from 99 results
VIDEO: नदीत कार कोसळली,सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद

व्हिडीओJul 16, 2018

VIDEO: नदीत कार कोसळली,सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद

नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसी भागातून वाहणाऱ्या घोट नदीच्या पात्रात एक कार पडल्याची धक्कादायक घटना घडली. या नदीवरील पुला वरून जात असताना वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि पुलाची उंची कमी आणि संरक्षक भिंत नसल्याने गाडी थेट नदी पात्रात पडली. पाऊस पडत असल्याने नदीचा प्रवाह अतिशय वेगात होता परंतु एका दगडाला अडकल्याने ही गाडी एका जागी स्थिर झाली. या गाडी मध्ये एकूण चार जण होते ज्यामध्ये एक लहान मुलीचा देखील समावेश आहे. सदर घटनास्थळी घोट गावातील गावकऱ्यांनी धाव घेत रस्सीच्या साहाय्याने या सर्व प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढलं. नशीब बलवत्तर आणि काळ आला होता परंतु वेळ नाही म्हणून हे सर्व कुटुंब सुखरूप या धक्कादायक घटनेतून बाहेर येऊ शकलं. त्यामुळे सदर कुटुंबाने गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले.

ताज्या बातम्या