नवी मुंबई, 07 नोव्हेंबर : सोसायटीमध्ये कार येत असताना अचानक तिच्यावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या एका 6 वर्षाच्या मुलीला उडवल्याची घटना घडली आहे. कळंबोलीतील साईनगर सोसायटीमधील ही घटना आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या अपघातात मुलगी गंभीर जखमी असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.