#cancer

वयाच्या १० व्या वर्षी आदितीने घडवलं मानवतेचं दर्शन

महाराष्ट्रOct 1, 2018

वयाच्या १० व्या वर्षी आदितीने घडवलं मानवतेचं दर्शन

गोविंद वाकडे, १ ऑक्टोबर २०१८- खरंतर प्रत्येक स्त्रीचं आपल्या केसांवर खूप प्रेम असतं. मग ती लहान वयाची मुलगी असो किंवा अगदी सत्तरीच्या आजी. पिंपरीतल्या आदितीनं कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आपले केस दान करुन एवढ्या लहान वयात एक वेगळा आदर्श घालून दिलाय. आपले काळेभोर लांबसडक केस दान करुन आदितीनं आपल्यातल्या संवेदनशीलतेची ओळख करुन दिली. कौतुकास्पद गोष्ट म्हणजे तिच्या या निर्णयाला तिच्या कुटुंबियांनीही पाठींबा दिला. आदिती चिंचवडमधील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाचवी इयत्तेत शिकते. आज आदितीच्या या उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे.

Live TV

News18 Lokmat
close