#calves

VIDEO : तब्बल 18 दिवसांनंतर भेट, आईने सोबत नेलं आपल्या 3 बछड्यांना!

व्हिडिओFeb 7, 2019

VIDEO : तब्बल 18 दिवसांनंतर भेट, आईने सोबत नेलं आपल्या 3 बछड्यांना!

7 फेब्रुवारी : आई जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी तिचं लक्ष हे पिलांपाशीच असतं..फक्त माणसंच नाही तर प्राण्यांमध्येही हीच ममता बघायला मिळते. नाशिकमध्ये 18 दिवसांपूर्वी ऊसाच्या फडात बिबट्याचे तीन बछडे सापडले होते. अखेर त्यांची आई म्हणजे मादी बिबट्या रानात येऊन तिन्ही बछड्यांना घेऊन गेली. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला Eus. बिबट्याची ही पिल्लं दोन आठवड्यांपासून पळसे शिवारातील गायधनी यांच्या शेतात असल्यानं मादी बिबट्याचा शिवारात वावर होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं. 20 जानेवारीपासून वन विभागाचं बछड्यांना रानातच सुरक्षित ठेवून तिथं कॅमेरा लावून ठेवला होता. त्या कॅमेरात बिबट्याची आई आपल्या पिलांना घेऊन जाताना कैद झाली.

Live TV

News18 Lokmat
close