नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशासह राज्यातही तणावाचं वातावरण आहे. त्याच अनुषंगानं एक महत्त्वाची बातमी एसटी चालकाच्या सतर्कतेमुळं टाळलेल्या एका मोठ्या घातपाताची. कर्जतहून आपटा गावाकडं निघालेल्या एसटी बसमध्ये चक्क बॉम्ब आढळून आला. एका बॅगमध्ये तो ठेवण्यात आला होता. त्याचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र एसटी बस चालकाच्या प्रसंगावधानामुळं घातपाताचा प्रयत्न फसला.