#building

Showing of 1 - 14 from 129 results
पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत; LIVE VIDEO

व्हिडिओFeb 12, 2019

पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत; LIVE VIDEO

नागपूर, 12 फेब्रुवारी : सीताबर्डी भागातील अनधिकृत दुकानांवर कारवाई सुरू असताना अचानक 'गेसन्स' दुकानाची इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. दुकानाची अनधिकृत इमारत पाडण्याचं काम सुरू असतानाच ही घटना घडली. या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झालं नाही. मात्र, पोकलँडची डिझेलची टाकी फुटल्याने सर्व डिझल वाहून गेलं. यात सुमारे दीड लाखांचं नुकसान झालंय. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवरील अवैध ताबा हटवा, अशी नोटीस सीताबर्डी परिसरातील 42 दुकानदारांना देण्यात आली होती. सीताबर्डीतील मुंजे चौक परिसरातील मोक्याच्या जागेवर असेलेल्या 33 दुकानांवर ही कारवाई सुरू आहे.

Live TV

News18 Lokmat
close