नाशिक, 1 मार्च : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज नाशिकमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी शहीद निनाद मांडवगणे यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. याठिकाणी जेव्हा शहीद निनाद यांची पत्नी त्यांच्या चिमुकलीला घेऊन दाखल झाल्या तेव्हा वातावरण अगदी भावूक होऊन गेलं होतं. आपल्या बाबांना अखेरचा निरोप देण्यासाठी कसा सॅल्युट करायचा, हे छोटीला सांगतानाचा क्षण तिथे उपस्थित असलेल्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता.