#borivali

VIDEO : चोराचा पाठलाग करताना रूळावर मारली उडी; थेट पोहोचला ICU मध्ये

व्हिडिओJan 22, 2019

VIDEO : चोराचा पाठलाग करताना रूळावर मारली उडी; थेट पोहोचला ICU मध्ये

मुंबई, 22 जानेवारी : बोरीवली स्टेशनवर एक गुजराती कुटुंब ट्रेनची वाट बघत प्लॅटफॉर्मवर उभं होतं. दरम्यान, एका चोराने त्यातील एका मुलाचा मोबाईल खेचून पळ काढत रेल्वे रुळांवर उडी मारली. पाठोपाठ ज्याचा मोबाईल चोरला गेला त्यानं चोराला पकडण्यासाठी उडी मारली. मात्र त्याच क्षणाला प्लॅटफॉर्मवर गाडी आल्यानं मुलगा लोकलची धडक बसल्याने जखमी झाला. तरुणाला रुळावर तडफडत बघितल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हा सर्व प्रकार स्टेशनवरील सीसीटिव्हीत कैद झालाय. जखमी मुलावर ICU मध्ये उपचार सुरू असून, मोबाइल चोराला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती आहे.

Live TV

News18 Lokmat
close