जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात 42 जवान शहीद झाले आहे. यामध्ये शाहपुरा येथील रोहिताश लांबा यांचा समावेश आहे. रोहिताश लांबा हे अमरसर स्टेशन परिसरात गोविंदपुरा येथील राहणारे होते. 2 वर्षांपूर्वीच ते सैन्यात भरती झाले होते. वर्षभरापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. त्यांना दोन महिन्याची मुलगी आहे. सुट्टीवरून आल्यानंतर ते ड्युटीवर रूजू झाले होते. आज पुलवामा स्फोटात रोहिताश लांबा शहीद झाले आहे. रोहिताश यांच्या निधनाच्या बातमीमुळे शाहपुरावर शोककळा पसरली आहे.