#bollybood

सिद्धार्थ जाधवच्या गुडघ्याला पुन्हा बाशिंग! यासोबत इतर महत्त्वाच्या घडामोडी

बातम्याJun 19, 2019

सिद्धार्थ जाधवच्या गुडघ्याला पुन्हा बाशिंग! यासोबत इतर महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई, 19 जून: मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित 'लग्नकल्लोळ' या चित्रपटाला सिद्धार्थ जाधवचा नवा लूक सोशल मिडियावर खूप चर्चेत आहे. वधू-वर सूचक केंद्राचा बॅच लावून तो एका वधूच्या शोधात आहे असे दिसत आहे. लग्नानंतरचे सुगीचे, आनंदाचे असे नव्याचे नऊ दिवस संपले की, सुरुवात होते ती खऱ्या आयुष्याला, या संकल्पनेवर आधारित हा सिनेमा आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ असल्याने यात लग्न, धमाल, गोंधळ असा सगळा मसाला बघायला मिळणार आहे. यासोबत मनोरंजन विश्वातील घडामोडी.