सागर कुलकर्णी आणि दिनेश केळुसकर,19 फेब्रुवारी : सेना-भाजपची युती झाल्याने कोकणातील आपलं राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी नारायण राणेंनी आतापासूनच जोरदार हालचाली सुरू केल्या आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, राणे सेनेविरोधात उमेदवार देतानाच तळकोकणात आघाडीकडेही पाठिंबा मागणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देण्यास मात्र, त्यांनी साफ नकार दिला आहे. त्यामुळे तळकोकणात यावेळीही शिवसेना विरूद्ध राणे असा सामना बघायला मिळणार हे नक्की..