#bicycle

दुसऱ्या जातीत लग्न केलं म्हणून सायकलवरून न्यावा लागला मृतदेह

व्हिडिओAug 2, 2018

दुसऱ्या जातीत लग्न केलं म्हणून सायकलवरून न्यावा लागला मृतदेह

ओडिशा, ०२ ऑगस्ट- ओडिशातील ती घटना तर तुम्हाला माहितीच असेल, जेव्हा अॅम्ब्युलन्ससाठी पैसे नसल्यामुळे दाना मांझी नावाच्या व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर उचलून न्यावा लागला होता. आता ओडिशातील बौद्ध जिल्ह्यात अशीच काहीशी घटना घडली आहे. गावातील लोकांनी खांदा देण्यास नकार दिल्यामुळे पतीला सायकलवरून पत्नीचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत न्यावा लागला. गावकऱ्यांच्या या कृती मागचे कारण होते ते म्हणजे मृत महिलेच्या बहिणीच्या नवऱ्याने दुसऱ्या जातीत लग्न केले. ओडिशातील कृष्नापल्ली गावात राहणारे चतुर्भुज बांकने पहिल्या पत्नीकडून मुल होत नसल्यामुळे दुसऱ्या जातीतील मुलीशी लग्न केले. यानंतर गावातील लोकांनी त्या घरातल्यांना वाळीत टाकले. चतुर्भुजच्या पत्नीच्या बहिणीला काही दिवसांपासून जुलाबाचा त्रास होत होता. दोन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. अॅम्ब्यूलन्सने तिचा मृतदेह चतुर्भुजच्या घरी सोडला. मात्र गावकऱ्यांनी त्या मृतदेहाला खांदा देण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर चतुर्भुजने सायकलला मृतदेह बांधून तो स्मशानभुमीत घेऊन गेला आणि तिथे अंतिम संस्कार केले.

Live TV

News18 Lokmat
close