संदीप मोरे, प्रतिनिधी शिवडी, 16 डिसेंबर : संभाजी भिडे यांच्या सभेला परवानगी देऊ नयेत, अशी मागणी करूनही ही भिडे यांच्या सभेचं आयोजन शिवडी येथील बारादेवी शाळेच्या मैदानात करण्यात आलं होतं. त्यामुळे या सभेविरोधात दलित युथ पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने आणि घोषणाबाजी केली. परावनगी नसताना सभा घेतल्यानं युथ पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला.