मुंबई, 30 डिसेंबर : मोदी आणि फडणवीस लोकांना घाबरतात, म्हणूनच त्यांनी मला नजरकैदेत ठेवलं, असं म्हणत भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद काही वेळातच पुण्याच्या दिशेने निघणार आहेत. आझाद यांना ठेवण्यात आलेल्या मुंबईतील मनाली हॉटेलच्या बाहेर कार्यकार्त्यांनी एकच गर्दी केली आहे.