#belgaum city

VIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...

व्हिडिओNov 14, 2018

VIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...

विकास शिवणे, १४ नोव्हेंबर : गेल्या सहा दिवसांपासून बेळगाव शहराजवळील उपनगरात बिबट्या सदृश्य प्राणी आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर वन विभागाने यावर पडदा टाकला आहे. तो बिबट्या नसून मोठ्या जातीचे शाकाहारी रानमांजर असल्याचे स्पष्टीकरण वनविभागाने दिल्यामुळे गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. विशेष म्हणजे, खुद्द वनविभागही बिबट्या असल्याचा संशयाने युद्धपातळीवर जेरबंद करण्यासाठी कारवाईला लागले होते गुरुवारी शहरानजीकच्या हिंडाल्को कॉलनीमध्ये सिंडिकेट बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिबट्या सदृश्य प्राण्यांचे व्हिडिओ चित्रण मिळाल्यामुळे परिसरातील नागरिकांची एकच घबराट उडाली होती. नागरिक जीव मुठीत घेऊन वावरत होते तर शेतकऱ्यांनी शिवाराकडे पाठ फिरवली होती. वनविभागाला ही तो नेमका कोण आहे याचा अंदाज न आल्याने यंत्रणा युद्ध पातळीवर कार्यरत होती. आज अखेर वनविभाग तो बिबट्या नसून मोठा जातीचा रानमांजर असल्याचं सांगितल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.