बेगूसराय, 08 जून : बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यातील खोरवापूर या गावातला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन व्यक्तींना लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करण्यात आली. एवढंच नाहीतर या दोघांना थुंकी चाटायलाही लावली आणि लाथा-बुक्यानेही मारहाण करण्यात आली. बिट्टू कुमार आणि समीर कुमार असं या तरुणांचं नाव आहे. या दोघांकडे असलेली बोलेरो गाडीचं अपहरण करून बंदुकीच्या धाकावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी रजनीश, पंकज कुमार आणि सुबोध कुमार या तिघांना बेड्या ठोकल्या आहे.