News18 Lokmat

#beed

Showing of 66 - 79 from 306 results
VIDEO : 5 वर्षांत निधी कुठे आला? प्रीतम मुंडेंच्या प्रचाराला गेलेल्या भाजपच्या आमदारावर गावकरी भडकले

व्हिडिओApr 5, 2019

VIDEO : 5 वर्षांत निधी कुठे आला? प्रीतम मुंडेंच्या प्रचाराला गेलेल्या भाजपच्या आमदारावर गावकरी भडकले

सुरेश जाधव, बीड, 05 एप्रिल : बीडमधील भाजपच्या आमदार संगीता ठोंबरे या सध्या विरोधकाकडून सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल होत आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. भाजपच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांच्या प्रचारासाठी गावात गेल्या असता चक्क गावातील लोकांनी आमदारांना पाच वर्षात काय केलं अशा प्रश्नांचा भडीमार केला. केज तालुक्यातील माळेगाव इथं हा प्रकार घडला. गावातील लोकांनी ठोंबरे यांचा सत्कार केला. पण जेव्हा भाषणाला उभ्या राहिल्या तेव्हा गावातील लोकांनी पाच वर्षांचा हिशेब विचारायला सुरुवात केली. विकास कामे, निधी, पीक विमा, रस्ते कुठे आहेत असे प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे आयोजक आणि ग्रामस्थ हमरीतुमरीवर आले होते. अचानक उडालेल्या या गोंधळामुळे आमदार ठोंबरे देखिल संतापल्या होत्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.