Beed News

Showing of 79 - 91 from 91 results
VIDEO : बीडमध्ये 'सैराट', बहिणीने प्रेमविवाह केल्याने भावानं केली मेव्हण्याची हत्या

व्हिडीओDec 19, 2018

VIDEO : बीडमध्ये 'सैराट', बहिणीने प्रेमविवाह केल्याने भावानं केली मेव्हण्याची हत्या

सुरेश जाधव, प्रतिनिधी,बीड, 19 डिसेंबर : खोट्या प्रतिष्ठेसाठी 'सैराट' सिनेमात ज्या प्रकारे आर्ची आणि परश्याची हत्या करण्यात आली होती अशीच घटना बीडमध्ये घडली आहे. बहिणीनं प्रेम विवाह केला या रागातून भावाने आपल्या मित्राच्या मदतीने बहिणीच्या पतीची भररस्त्यावर निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरातील आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेटवर हा गंभीर प्रकार घडला. इंजिनिअरिंगची परीक्षा देवून परतत असताना सुमित शिवाजी वाघमारे आणि त्यांची पत्नी भाग्यश्री वाघमारे यांच्यावर मोटार सायकलवर आलेल्या बालाजी लांडगे आणि त्यांच्या मित्रानं धारधार शस्त्रानं हल्ला केला यात सुमितचा जागीच मृत्यू झाला. तर भाग्यश्री जखमी झाली आहे. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading