Baroda Videos in Marathi

VIDEO : चोरट्यांची हिम्मत पहा... बँकेच्या तिजोरीतून पळवली 2 लाखांची चिल्लर

व्हिडीओDec 25, 2018

VIDEO : चोरट्यांची हिम्मत पहा... बँकेच्या तिजोरीतून पळवली 2 लाखांची चिल्लर

भुरकुंडा, 25 डिसेंबर : चोरट्यांनी किती हिम्मत वाढली आहे हे या व्हिडिओवरून लक्षात येईल. झारखंडमधल्या भुरकुंडा येथे भर वस्तीत असलेल्या बँक ऑफ बडौदाच्या तिजोरिवरच चोरट्यांनी हात साफ केला. या तिजोरीत खुरदा (चिल्लर) स्वरुपात ठेवलेले दोन लाखांहून अधिक रुपये चोरटे घेऊन पसार झाले. हा सर्व प्रकार लॉकर रुममधल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लॉकर रुममध्ये प्रवेश केल्यानंतर त्या दोघांनी आधी तिजोरी फोडली आणि त्यात ठेवलेली चिल्लर घेऊन ते पसार झाले. जाण्यापूर्वी त्यांनी तेथल्या लोखंडी पेट्याही उघडून पाहिल्या. या प्रकारानंतर भुरकुंडा पोलीस खडबडून जागे झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे.