पुणे, 6 जानेवारी : राज ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन त्यांना अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका दिली. राज ठाकरे हे वेळोवेळी बाबासाहेब पुरंदरे यांचं मार्गदर्शन घेत असतात. त्यामुळं मुलाच्या लग्नाच्या आमंत्रितांमध्ये साहजिकच बाबासाहेब पुरंदरे यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय.