15 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. औरंगाबादेत नागरिकांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. काही जणांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून आपला रोष जाहीर केला. तर औरंगाबादेत शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांनी तर पाकिस्तानच्या नकाशावर प्रतिकात्मक गोळीबार करून निषेध व्यक्त केला.