आज झालेल्या अंतिम लढतीत भारताने मलेशियावर 2-1 अशी मात करत आशिया चषक हॉकीचे विजेतेपद पटकावले. रमणदीप सिंग आणि ललित उपाध्याय यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.