Ashok Chavan

Showing of 79 - 92 from 194 results
VIDEO : अशोक चव्हाण म्हणतात... 'भाजपचं आतून कीर्तन वरून तमाशा'

व्हिडीओFeb 8, 2019

VIDEO : अशोक चव्हाण म्हणतात... 'भाजपचं आतून कीर्तन वरून तमाशा'

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 8 फेब्रुवारी : लोकसभेबरोबरच राज्यात विधानसभेच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात अशी शक्यता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्यांचा दावा चूकीचा असल्याचं म्हटलंय. त्यावर न्युज18 लोकमतशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, हा विषय मुख्यमंत्र्यांच्या हातचा नाही, तो निवडणूक आयोगाचा आहे. पंतप्रधाना निही दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याचं सुतोवचं केलं असल्यामुळे एकत्र निवडणुका झाल्यास त्यांना सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. कधी ''उखाड देगे'', तर कधी ''फेक देगे'' अशी विधाने भाजपच्यावतीनं केली जातात. त्यामुळे काय चाललंय हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. ''भाजपचं आतून किर्तन वरून तमाशा'' अशी स्थिती असल्याचं ते यावेळी म्हणाले. पाहुया न्युज18 लोकमतचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी बोलताना ते आणखी म्हणाले...

ताज्या बातम्या