यवतमाळ, 11 जानेवारी : यवतमाळ इथं सुरू झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखिका नयनराता सेहगल यांना दिलेलं निमंत्रण परत घेणं हा मुद्दा गाजत राहिला. अध्यक्षा अरुणा ढेरे यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वांनाच खडे बोल सुनावले. नयनतारा सहगल यांना न बोलावणं हे मराठी साहित्य विश्वासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. आज कुणीही येतो आणि साहित्य विश्वाला वेठीला धरतो हे खपवून घेता कामा नये असंही त्यांनी ठासून सांगितलं.