Amit Shaha Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 24 results
VIDEO: नेते नजरकैदेत, कलम 144 लागू; काय आहे जम्मूची आताची स्थिती?

बातम्याAug 5, 2019

VIDEO: नेते नजरकैदेत, कलम 144 लागू; काय आहे जम्मूची आताची स्थिती?

जम्मू काश्मीर, 05 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमधील तणावात आणखी वाढ झाली आहे. या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सुरक्षा व्यवस्थाही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट आणि लँडलाईन सेवाही बंद करण्यात आली आहे. काश्मीरमधील सर्व सरकारी शाळा, महाविद्यालयं आणि इतर संस्थांना सोमवारपासून सुट्टी देण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना सॅटेलाईट फोन देण्यात आले आहेत. ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांच्यासह प्रमुख राजकीय नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. काश्मीरमध्ये होणाऱ्या घडामोडींबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं. कलम '35अ' बद्दल महत्त्वपूर्ण निर्णय या आठवड्यात घेतला जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading