#american

...त्याला समोर मृत्यू दिसत होता, पॅराग्लायडिंगचा थरारक VIDEO

व्हिडिओFeb 13, 2019

...त्याला समोर मृत्यू दिसत होता, पॅराग्लायडिंगचा थरारक VIDEO

13 फेब्रुवारी : स्वित्झर्लंडमध्ये जीवनात पहिल्यांदाच पॅराग्लायडिंगचा थरार अनुभवण्यासाठी आलेल्या ख्रिस नावाच्या एका पर्यटकाला जीवघेण्या प्रसंगातून जावं लागलं. पॅराग्लायडिंग दरम्यान पायलट घाईघाईत पॅराग्लायडरचं सेफ्टी हूक ग्लाडरला अडकवण्यास विसरला आणि त्यानंतर सुरू झाला जीवघेणा थरार.. ग्लायडर हवेत झेपावल्यानंतर हूक अडकवलं नसल्याचं दोघांच्या लक्षात आलं. त्यामुळं पायलटला धरुन ठेवण्याशिवाय ख्रिस समोर पर्याय नव्हता. पण जास्त काळ ग्लायडरला लटकणं शक्य नव्हतं. कारण, हळूहळू हाताची पकड सैल होवू लागली होती. समोर साक्षात मृत्यू दिसत होता. मात्र, जगण्याची जिद्द कायम होती.

Live TV

News18 Lokmat
close