#ambabai

Showing of 1 - 14 from 29 results
VIDEO : खरच बदलणार का कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती?

व्हिडिओDec 14, 2018

VIDEO : खरच बदलणार का कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती?

कोल्हापूर, 14 डिसेंबर - लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदलण्याची मागणी भक्तांमध्ये जोर धरु लागली आहे. अंबाबाईची मूर्ती अतिशय पुरातन असून, ती दुभंगल्यानं बदलण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद ताबंट यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. मात्र, मूर्ती बदलण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं स्पष्टीकरण देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी न्यूज18 लोकमतला दिली. मूर्ती बदलण्याचा अद्याप कोणताही ठराव किंवा चर्चा पदाधिकाऱ्यांसोबत झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अंबाबाईची मूर्ती बदलण्याच्या मागणीला तूर्तास तरी ब्रेक लागला आहे.

Live TV

News18 Lokmat
close