#akola

Showing of 27 - 40 from 105 results
SPECIAL REPORT : घनदाट जंगलात पहारा देणाऱ्या रणरागिणींची कहाणी!

महाराष्ट्रFeb 4, 2019

SPECIAL REPORT : घनदाट जंगलात पहारा देणाऱ्या रणरागिणींची कहाणी!

कुंदन जाधव, 04 फेब्रुवारी : खरंतरं जंगल म्हटलं की, वन्यप्राण्यांच्या भीतीने भलेभले घाबरतात. पण, अशाच घनदाट जंगलामध्ये वनसंपदेचं आणि वन्यप्राण्याचं रक्षण करण्यासाठी महिला बटालियन तयार झाली आहे. आदिवासी भागातील महिलांची ही तुकडी इथे जंगलाचं रक्षण करत आहे. अकोला वनपरिक्षेत्रातील टायगर फोर्स अंतर्गत तयार करण्यात आलेली 14 महिलांची ही तुकडी सध्या ज्ञानगंगा अभयारण्यात सुरक्षेचं काम करत आहे. ज्ञानगंगा अभयारण्य 205 चौरस किलोमीटरवर विस्तारलेले आहे. या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात बिबटे, अस्वल, सांभर, नीलगाय, रानडुक्करांचा वावर आहे. इथे मोठ्या प्रमाणात पर्यटकही येतात, या वनाची आणि वन्यप्राण्यांची सुरक्षा पुरुषांच्या बरोबरीनं महिलांच्या फोर्सवरही आहे.

Live TV

News18 Lokmat
close