शोधा राज्य/ मतदार संघ

#accident

Showing of 40 - 53 from 220 results
VIDEO : बारवी धरण परिसरात विद्यार्थ्यांची कार उलटली, 2 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रJan 30, 2019

VIDEO : बारवी धरण परिसरात विद्यार्थ्यांची कार उलटली, 2 जणांचा मृत्यू

गणेश गायकवाड, बदलापूर, 30 जानेवारी : बारवी धरण परिसरात काॅलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 5 जण जखमी झाले आहे. बदलापुरातील बारवी धरण परिसरात काॅलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप फिरण्यासाठी एर्टीगा कारने आला होता. अचानक कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार उलटली. या अपघातात एक तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. नुपम तायडे (१८) आणि रुतिका कदम (१८) अशी मृतांची नावं आहे. तर ५ विद्यार्थी जखमी झाले आहे. हे सर्वजण उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील राहणारे आहे. जखमींवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे तर काहींना मुंबईला हलवण्यात आलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close