शोधा राज्य/ मतदार संघ

#accident

Showing of 27 - 40 from 220 results
VIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत!

महाराष्ट्रFeb 23, 2019

VIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत!

नितीन बनसोडे, लातूर, 23 फेब्रुवारी : एका व्यक्तीला धडक देऊन त्याला 22 किमीपर्यंत फरफटत नेण्याचा धक्कादायक प्रकार रेणापूर तालुक्यातील निवाडा इथं समोर आला आहे. हा प्रकार गुरुवारी पहाटे घडल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. धडक दिल्यानंतर मारहाण होण्याच्या भीतीनं चालकानं पळ काढल्याचं सांगितलं जात आहे. निवाडा फाट्याजवळ लातूरकडे जाणाऱ्या कार (क्र. एम. एच. ०४ ईडी ५२५२) एका व्यक्तीला धडक दिली. या धडकेनंतर ही व्यक्ती चारचाकीच्या खाली आली. पण, चालकाने गाडी न थांबवता ती चालूच ठेवली. तब्बल 22 किमीपर्यंत त्याने गाडी चालवत नेली. यावेळी मृतदेह गाडीच्या खालच्या भागाला लटकलेला होता. लातूर शहरातील औसा रस्त्यावरील एका रुग्णालयाजवळ हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. मृताचे नाव अश्रुबा सिद्धराम मोरे असं असून, ते पोहरेगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. ही चारचाकी अंबाजोगाई येथील असून, ती अंबाजोगाईहून लातूरला जात होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश शिंगणकर करत आहेत.

Live TV

News18 Lokmat
close