#accident

Showing of 1 - 14 from 145 results
VIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...

व्हिडिओNov 13, 2018

VIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...

मुंबई, 13 नोव्हेंबर : धावत्या गाडीतून उतरताना पडलेल्या एका प्रवाशाचे दोन आरपीएफ जवानांनी प्राण वाचवले. मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास दादर रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक 6 वर घडलेली ही घटना सिसि टिव्हीत कैद झाली आहे. 'चालत्या गाडतून उतरू नका'', अशी सूचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते, पण त्याकडे जीणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. ही घटना दादर रेल्वे स्थानकावर तेव्हा घडली, जेव्हा सुरेंद्र ताटी नामक 24 वर्षीय युवक हैद्राबादला जाणाऱ्या गाडीतून उतरण्याचाय प्रयत्नात होता. दरवाज्यात सामान घेऊन उभ्या असलेल्या सुरेंद्रने उलट्या दिशेने उतरण्याचा प्रयत्न करताच त्याचा तोल गेला आणि धावत्या गाडीच्या आणि फलाटामधील जागेत त्याचा एक पाय अडकला गाडीनं त्याला फरफटत नेलं. पण, त्याचं दैव बलवत्तर की, त्याच फलाटावर ड्युटीवर असलेल्या विनीत सिंह आणि दीवान सिंग या आरपीआफ जवानांनी धाव घेतली आणि त्याला सुरक्षीत बाहेर काढलं. यावेळी त्या जवानांच्या मदतीला फलाटावर उभे असलेले कही लोकंही धाऊन आले.

Live TV

News18 Lokmat
close