#5 किलो

देवालाच फसवणारा चोर; मंदिरातल्या चोरीचा LIVE VIDEO

बातम्याDec 21, 2018

देवालाच फसवणारा चोर; मंदिरातल्या चोरीचा LIVE VIDEO

धनबाद, 20 डिसेंबर : झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील नयडांगा गावात काली मातेचं प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातील देवीच्या मुर्तीवरील 5 किलो दागिने चोरीला गेले आहेत. हातोड्याचे घाव घालून त्याने मंदिराचं कुलूप फोडलं आणि आत प्रवेश केला. मंदिरात प्रवेश करताच चोरट्याने आधी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याला फडकं गुंडाळलं. त्यानंतर त्याने देवीचा चांदीचा हार आणि इतर दागिने गोळा केले. तेथून रफुचक्कर होण्याआधी मात्र तो देवीच्या पाया पडायला विसरला नाही. देवालाच फसवणाऱ्या या चोराचे सर्व कारनामे मंदिरात लागलेल्या इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच निरसा पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं आहे. काली मातेच्या मंदिरात झालेल्या चोरीमुळे भाविकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे.

Live TV

News18 Lokmat
close