शोधा राज्य/ मतदार संघ

#2611

Showing of 235 - 248 from 386 results
दहशतवादी प्रवृत्तीचा हा नायनाट -उज्ज्वल निकम

बातम्याNov 21, 2012

दहशतवादी प्रवृत्तीचा हा नायनाट -उज्ज्वल निकम

21 नोव्हेंबरभारतात दहशतवाद्याविरोधात कठोर कारवाई केली जाते असा संदेश आता अतिरेकी संघटनेना दिला गेला आहे. कसाबच्या फाशीच्या अंमलबजावणीमुळे मला दिलासा मिळाला आहे. 26/11 च्या हल्ल्यात 166 लोकांना प्राण गमवावे लागले आणि 238 जण जखमी झाले त्यांना न्याय मिळाल्याची भावना माझ्या मनात आहे. कसाबला गुपचुप फाशी दिली हा आरोप चुकीचा आहे. आपल देश हा लोकशाहीचा देश आहे. इथं भरचौकात कोणाला फाशी दिली जात नाही. न्यायालयीन प्रक्रियाद्वारेच कसाबला फाशी देण्यात आली आहे. यात चुपीचा काही संबंध नाही. कसाबला फाशी ही एका दहशतवादी प्रवृत्तीचा हा नायनाट आहे असं मत सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं.

Live TV

News18 Lokmat
close