धुळे : लोकसभेच्या निवडणुकासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सूचक आणि तेवढंच महत्त्वाचं विधान केलंय. लोकसभा निवडणुकांसाठी 2 किंवा 3 मार्चपासून आचारसंहिता लागू होऊ शकते. कारण तसे संकेतच रावसाहेब दानवे यांनी धुळ्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांशी बोलताना दिलेत. लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तुम्ही तुमची कामं करुन घ्या असंही आवाहन दानवेंनी नगरसेवकांना केलंय.