#20

Showing of 8074 - 8087 from 9283 results
सरकार बरखास्त करा !

बातम्याAug 10, 2011

सरकार बरखास्त करा !

10 ऑगस्टमावळ गोळीबार प्रकरणाचा मुद्दा लोकसभेतही उपस्थित करण्यात आला. भाजप आणि सेना खासदारांनी हा मुद्दा उपस्थीत केला. निरपराध शेतकर्‍यांवर गोळीबार करणार्‍या महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची मागणी गोपिनाथ मुंडे यांनी केली. या मुद्यावर लोकसभेच कामकाज दिवसभर चालू देणार नाही असा इशाराही भाजप-सेनेच्या खासदांरानी दिला. दरम्यान, लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. तर राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे. तर विधानसभेत ही विरोधकांनी गोंधळ घातला. गोळीबार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी खडसे यांनी केली. तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींना 50 हजारांची मदत देण्याची मागणीही केली. या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज सुरूवातीला 20 मिनिटासाठी आणि नंतर अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आलं. पवना धरणाच्या जलवाहिनीवरून मावळ इथं झालेल्या गोळीबारावरून आज विधिमंडळात आणि विधानभवनाबाहेरही विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ घातला. विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत ठाण मांडलं होतं. विधानसभेत विरोधकांनी अजित पवार यांनी जनरल डायरची उपमा देणारा बॅनर झळकावला. या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आलं. विधानसभेचं कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तराचा तास रद्द करून गोळीबार प्रकरणावरील स्थगन प्रस्ताव स्विकारावा आणि चर्चा करावी अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली. दरम्यान, आता मावळ गोळीबारावर विधानसभेत चर्चा सुरु झाली आहे. या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज सुरूवातीला 20 मिनिटासाठी आणि नंतर अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आलं. विरोधकांच्या घोषणाबाजीनंतर सरकारने या विषयावरील स्थगन स्विकारला मात्र तरीही विरोधकांकडून चर्चेला सुरूवात होत नव्हती. या विषयावरील चर्चा झाल्यानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे अशी विरोधकांची मागणी होती. मात्र अध्यक्ष याबाबत ठोस निर्णय देत नसल्यानं विरोधकांची घोषणाबाजी वाढली आणि अध्यक्षांनी विधानसभेचं कामकाज दुसर्‍यांदा अर्धातासासाठी तहकूब केलं.