#20 साप

VIDEO : मुंबईतल्या 'बीकेसी'त निघाला अकरा फुटाचा अजगर; नागरिकांमध्ये दहशत

व्हिडिओOct 1, 2018

VIDEO : मुंबईतल्या 'बीकेसी'त निघाला अकरा फुटाचा अजगर; नागरिकांमध्ये दहशत

मुंबई, 30 सप्टेंबर : मुंबईतल्या बीकेसी भागात एका अकरा फुटी अजगराची सर्पमित्रांनी सुटका केलीये. मुंबईत अऩेक भागात रस्त्यांची आणि मेट्रोची कामं सुरु आहेत. त्यामुळं सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत आढळतांना दिसताहेत. काल रात्री 11 फूट लांबीचा आणि 13 किलो वजनाच्या अजगराची सर्पमित्रांनी सुटक करत जंगलात सोडून दिलं. मुंबईच्या पोटात 40 मीटर जमिनीखाली भुयारी मेट्रोच्या कामासाठी मोठ्याप्रमाणात खोदकाम सुरू आहे. मोठ्या मशिनरीद्वारे हे काम सुरू आहे. जमीन खोदकाम सुरू असल्याने मोठे हादरे जमिनीखाली बसत आहेत. यामुळे सरपटणारे प्राणी बाहेर पडून मानवी वसत्यांमध्ये शिरताहेत. असाच एक 11 फू़ट लांब अजगर शनिवारी रात्री वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील मानवी वस्तीत शिरला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ स्थानिक पोलीस आणि सर्प मित्रांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळावर पोहोचलेल्या सर्पमित्रांनी 13 किलो वजनाच्या हा अजगर पकडला आणि त्याला ठाण्याच्या जंगलात सोडलं. गेल्या वर्षभारात या परिसरात 20 साप आणि अजगर आढळले असून, त्यांना सुरक्षितरित्या जंगलात सोडण्यात आलं असल्याची माहिती सर्पमित्र अतुल कांबळे यांनी न्यूज18 लोकमतला दिली.