11वी

Showing of 40 - 53 from 53 results
11वी प्रवेशासाठी वाट पाहा...

बातम्याJun 18, 2010

11वी प्रवेशासाठी वाट पाहा...

18 जूनअकरावीच्या प्रवेशाला कोर्टाने अखेर आज स्थगिती दिली आहे. अकरावी प्रवेशासाठी राज्य सरकारने घेतलेल्या बेस्ट फाईव्ह फॉर्म्युलाला 21 पालकांनी मिळून मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. त्यावर आज हायकोर्टात सुनावणी झाली. त्यात कोर्टाने बेस्ट फाईव्हचा निर्णय पुढे ढकलला आहे. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 22 जूनला होणार आहे. यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रियाही लांबू शकते.आयसीएई बोर्डाच्या पालकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. आयसीएसईला सात विषय आहेत. त्यामुळे त्यांनाही बेस्ट फाईव्ह लागू करण्यात यावे, अशी मागणी कोर्टात करण्यात आली आहे. एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी त्यांच्या एकूण 6 विषयांपैकी दिली जात असे. मात्र केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांशी असलेली स्पर्धा लक्षात घेता सर्वाधिक गुण मिळवलेल्या 5 विषयांतील टक्केवारी या वर्षी गृहीत धरण्यात आली आहे. यामुळे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत भरघोस वाढी झाली आहे. त्यामुळे आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, असा पालकांचा आरोप आहे. आता 22 जूनला कोर्ट काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading