News18 Lokmat

#11वी

Showing of 27 - 40 from 43 results
'बेस्ट फाईव्ह'च कायम

बातम्याJul 13, 2010

'बेस्ट फाईव्ह'च कायम

13 जुलैबेस्ट फाईव्ह फॉर्म्युला कायम राहील, असा अंतरिम आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिला. बेस्ट फाइव्ह प्रकरणाची अंतिम सुनावणी ऑक्टोबरमध्ये होणार आहे. आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना हा बेस्ट फाईव्हचा फॉर्म्युला सशर्त आणि ऐच्छिक असणार आहे. बेस्ट फाईव्हचा जीआर मुंबई हायकोर्टाने रद्द केला होता. पण आज सुप्रीम कोर्टाने 25 फेब्रुवारीचा हा जीआर कायम ठेवला. तसेच बेस्ट फाईव्ह फॉर्म्युल्यानुसार देण्यात आलेली मार्कशिटस् कायम ठेवली जाणार आहेत. नव्याने मार्कशिटस् छापायची काही गरज नाही, असेदेखील कोर्टाने आज स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे 11 वी प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. तसेच सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यसरकारच्या वतीने ऍड. संजय खर्डे आणि ऍड. पी. पी. राव यांनी काम पाहिले. तर एसएससी बोर्डाच्या वतीने ज्येष्ठ वकील ऍड. हरिष साळवे केस लढत होते. शिवसेनेच्या हस्तक्षेप याचिकेसाठी ऍड. एम. पी. राव यांनी काम पाहिले.तर आयसीएसई बोर्डाने ऍड. मुकुल रोहतगी आणि ऍड. सोली सोराबजी या ज्येष्ठ वकिलांना उतरवले होते. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश शिरपूरकर, सिरिऍक जोसेफ यांच्या खंडपीठाने हा अंतरिम निकाल दिला.