हैदराबाद Videos in Marathi

Showing of 53 - 57 from 57 results
अस्वस्थ हैदराबाद

May 13, 2013

अस्वस्थ हैदराबाद

हैदराबाद....निजामाची राजधानी....स्वातंत्र्यपूर्व भारतातल्या 600 संस्थानांपैकी सगळ्यात बलाढ्य आणि श्रीमंत संस्थान...हैदराबाद अनेक घडनांनी धुमसत राहिलं. मे 2007 साली ऐन शुक्रवारच्या दिवशी दुपारची नमाज अदा करत असताना मक्का मशिदीत स्फोट झाला. त्यात काहीजण मारले गेले. हैदराबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानं अनेकांची आयुष्यं उद्धवस्त झाली. ज्यांच्या घरचा कर्ता माणूस गेला, त्यांचं नुकसान तर भरुन निघणं अशक्य आहे. पण जे जखमी झालेत, त्यांच्या शरीरावर झालेल्या जखमा भरुन निघतीलही, पण त्यांच्या मनावरच्या जखमा मात्र आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहेत. 21 फेब्रुवारी 2013 रोजी दिलसुखनगरमध्ये एकापाठोपाठ दोन स्फोटांनी पुन्हा हैदराबाद हादरले. या स्फोटात 17 जण ठार झाले. ऑगस्ट 2007च्या ल्युम्बिनी पार्क आणि गोकुळ चाट इथल्या स्फोटानंतर अगदी पाच वर्षांच्या अंतरावर हे दिलसुखनगरचे दोन स्फोट झाले. त्यामुळं त्याचा परिणाम इथं पर्यटन व्यवसायावर, बाजारपेठेतल्या उलाढालीवर आणि आयटी इंडस्ट्रीबरोबरच उद्योग क्षेत्रात येणार्‍या गुंतवणुकीवर दिसून येतोय. निजामाच्या राजवटीपासून ते आताच्या दिलसुखनगरच्या स्फोटापर्यंत नेहमीच काही ना काही घटनांनी हैदराबाद धुमसतंय. त्यामुळं शहरावर सातत्यानं अस्वस्थतेचे जमलेले काळे ढग दिसतात. शांत आणि ऐतिहासिक वारसा सांगत आपलं सांस्कृतिक सौंदर्य जपणार्‍या हैदराबादचा हा आढावा...

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading