#हैदराबाद

Showing of 14 - 27 from 53 results
VIDEO : मुलगी होत नाही म्हणून मुख्याध्यापकानं फोनवरून पत्नीला दिला तलाक

बातम्याDec 25, 2018

VIDEO : मुलगी होत नाही म्हणून मुख्याध्यापकानं फोनवरून पत्नीला दिला तलाक

हैदराबाद, 25 डिसेंबर : तिहेरी तलाकची प्रथा बंद करण्यासाठी नुकताच अध्यादेश काढण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात मात्र आलेलं नाही. 17 सेकंदाच्या फोनमुळे सुमैय्या बानूचं आयुष्य बदलून गेलं आहे. 28 नोव्हेंबरला सकाळी 10 च्या सुमारास सुमैय्याचा पती मोहम्मद मुजम्मिल शरीफचा तिला फोन आला. मोहम्मद मुजम्मिल शरीफ हा शाळेतील मुख्याध्यापक आहे. मुलगी होत नाही म्हणून फक्त 17 सेकंदाच्या संवादात त्याने तीनवेळा तलाक म्हणून सुमैय्याला तलाक दिला. तलाकची प्रथा बंद करण्यासाठी अध्यादेश काढला असूनही पोलिसांनी मात्र अजुनही त्याला ताब्यात घेतलं नाही. तिहेरी तलाकवर गुरुवारी म्हणजे 27 डिसेंबरला लोकसभेत चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने खासदारांना व्हिप जारी केलाय. सर्व खासदारांनी दोन दिवस संसदेत उपस्थित राहावं असा आदेश भाजपने काढला आहे. लोकसभेच्या निवडणुकांना आता फक्त चार महिने राहिले आहेत. त्यामुळं लोकसभेत होणाऱ्या चर्चेतून आपापल्या मतदारांना योग्य संदेश देण्याचं काम राजकीय पक्ष करणार आहेत. तर मुस्लीम महिलांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.